Terms & Conditions and Disclaimer
जाहीर निवेदन (Disclaimer)
 
१. घरून निघून शाळेत येताना अथवा शाळेतून निघून घरी जाताना विद्यार्थी कुठेतरी गेला अथवा घरी आलाच नाही तर त्या विध्यार्थ्याची संपूर्ण जबाबदारी पालकांवर राहील व शाळा जवाबदार राहणार नाही.

२.विध्यार्थ्याचा डबा  शक्यतोवर घरी केलेला असावा, बाहेरील खाद्य पदार्थ खाल्यावर जर विद्यार्थ्याला कुठलाही त्रास झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालकांवर राहील.

३.रिक्षा अथवा बस मधून येताना कुठलाही अपघात झाल्यास त्याला शाळा जबाबदार राहणार नाही.

४.शाळेमध्ये खेळताना विद्यार्थाला काही लागले (जखम झाली) व दवाखान्यात न्यायची वेळ आली तर शाळा दवाखान्यात न्यायची व्यवस्था करेल, परंतु पुढील सर्व खर्च पालकांनाच करावा लागेल.

५.शाळेचे नियम व अटी ह्या शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेत.त्या अटी जर मुलांकडून अथवा पालकांकडून पाळले न गेल्यास, त्यावर शाळेकडून दंडात्मक कार्यवाही होऊ शकते, न तसे झाल्यास पालकांकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही.

६.एकदा घेतलेला प्रवेश व त्यासाठी जमा केलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

७.विद्यार्थी शाळेमध्ये सतत गैरहजर रहात असेल व त्यामुळे त्याची शैक्षणिक प्रगती झाली नाही,तर त्याची जबाबदारी हि पालकांचीच असेल आणि त्याला शाळा किंवा शिक्षिका जबाबदार राहणार नाही.

८.पालकांनी भरलेला प्रवेशासाठीचा अर्ज बिनचूक भरावा नंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.शाळेकडे असलेल्या माहिती वरूनच दाखला देण्यात येईल.

९.शाळेने ठरवून दिलेल्या वेळेमध्येच पालकांनी शिक्षकांना भेटावे.

१०.शाळेचा दैनंदिन व्यवहार , वेळापत्रक अथवा कार्यक्रम हे शाळेच्या सोयीनुसार ठरवण्यात येतात,त्यामध्ये कोणताही बदल झाल्यास पालकांना आक्षेप घेता येणार नाही.

११.विद्यार्थाने शाळेच्या वस्तूंचे कोणत्याही प्रकारे नुकसान केले,तर, त्या वस्तूची किंमत पालकांकडून वसूल केली जाईल.

१२.शालेय वार्षिक आरोग्य तपासणी मध्ये आढळून आलेले दोष डॉक्टरकडून योग्य ती तपासणी करून सुधारावेत.

१३.वरील सर्व अटी  व नियम यांचे पालन करणे बंधनकारक आहे.