News


समर्थ माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल !!!
समर्थ शिक्षण मंडळ संचालित केशवनगर चिंचवडमधील समर्थ माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला.
सानिका सुनील नेहरकर हिने ९३.८०टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला.
शेयस पाटील याने ९१. २० टक्के गुण मिळवून दुसरा तर वेदश्री ब्रह्मे हिने ९०. ८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

समर्थ माध्यमिक विद्यालय , ८ वी ते १० वी स्वयं अर्थसाहाय्यीत तत्वावर शासनाची मान्यता


12th June, esakal - Pune edition - Pimpri chinchwad Today - pg 12

Home

राठी मातृभाषेतून शिक्षण देणारी अशी मराठी शाळा, संत ज्ञानेश्वरांची मराठी. संत तुकारामांची मराठी, छ. शिवाजी महाराजांची मराठी, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांची मराठी, मातृभाषेतून शिक्षण देऊन उच्चशिक्षित पिढी तयार करून देशसेवा करणारी अशी आमुची मराठी शाळा मनोरम प्राथमिक शाळा व बालक मंदीर

 नोबल – सर्वांगीण विकास घडवून राष्ट्रीय स्तरावर चमकणारे विद्यार्थी घडवायचे हीच आस. त्याच्यासाठीच केला हा अट्टाहास, हाच ध्यास घेऊन वाटचाल करणारी आमची मराठी शाळा मनोरम प्राथमिक शाळा व बालक मंदीर

 जिस्टर्ड करून सरकारमान्य खाजगी प्राथमिक शाळा विना अनुदानित तत्वावर ८ वर्षे यशस्वीपणे चालवून, सर्व सोयिनियुक्त प्रशि‍क्षित शि‍क्षकवृंद, जनमानसात लोकप्रिय अशी आमुची मराठी शाळा – मनोरम प्राथमिक शाळा व बालक मंदीर

 नोरम मनामनात आपलीशी वाटणारी ज्या ठिकाणी मुले रमतात ती वास्तू समर्थ शिक्षण मंडळ संचलित मनोरम प्राथमिक लवकरच माध्यमिक होऊ घातलेली, आणखीन एक पुढचे पाऊल आत्मविश्वासानी टाकलेले, ध्येय्याकडे नेणारे.

                                                                               + + + +


सुसंस्कृत व उच्चशिक्षित पिढी तयार करणे, की जी आपल्या कुटुंबाचे, गावाचे, देशाचे नांव पुढे आणतील, असे ध्येय बाळगणारी अशी ही संस्था! अश्या संस्थेच्या शाळेत प्रवेश घेऊन आपल्या मुलाचे भविष्य घडवा.

शिशु वर्गापासून सेमी इंग्रजी मधून शिकवणारी ‘ए’ ग्रेड म्हणून मान्यता प्राप्त मराठी माध्यमाची शाळा.


आमची वैशिष्ट्ये: 

१)     शिशुवर्गापासून सेमी इंग्रजीचे वर्ग
२)     प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष व त्यांच्या पालकांशी त्यांच्याविषयी चर्चा.
३)     प्रशिक्षित अध्यापक वर्ग.
४)     शाळेची स्वतंत्र इमारत, सर्व बाजूंनी कंपाऊंड.
५)     खेळायला स्वतंत्र मैदान
६)     सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात त्याच्या मागील विज्ञान विद्यार्थ्यांना कळावे हा हेतू.
७)     विविध प्रकल्प, खेळ, स्पर्धा, सहल संमेलन विद्यार्थ्यांसाठी विविध करमणूकीचे कार्यक्रम सादर केले जातात.
८)     सकाळ एन. आय. ई. सभासद.
९)    टिळक महाराष्ट्र परिक्षा, एम.टी.एस. स्कॉलरशिप, ऑलंपियाड गणित या विषयासाठी विद्यार्थ्यांची तयारी घेतली जाते.
१०)   विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा.
११)   मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ टॉयलेट.
१२)   स्वतंत्र प्रयोगशाळा व संगणक कक्ष.

   
             शाळा रजि. नं. -  एम्. ए. एच. / ४२१/पुणे/८०